********************************************
*पतेती किंवा पारशी नववर्ष*
आज पतेती त्या निमित्त या *पारशी* समाजी ओळख करून देण्याचा एक प्रयत्न .
*भारतातील मुंबई ,पुणे ,गुजरात* या बाजूला या धर्माचे लोक दिसून येतात. *हे लोक इराणकडून भारतात आले* त्याला कारण म्हणजे *मुसलमानी धर्म इराण मध्ये शिरला ,तेंव्हा तेथील आतल्या धर्माच्या रक्षणासाठी या लोकांनी देशांतर केले* व भारताचे रहिवासी झाले त्याचा खूप खूप फायदा आपल्या भारत देशाला झाला.
*पारशी धर्माचे संस्थापक " झरतुष्र्ट हा होय* हे लोक *अग्निपूजक* असून त्यांचा पवित्र धर्मग्रंथ *अवेस्ता* हा आहे .*बंधूभाव ,ऐक्य ,दानशूरपणा* या मुळे या समाजाने आपली वेगळी छाप भारतीय समाजावर निर्माण केलेली दिसते.*हा समाज म्हणजे शांतीप्रिय ,बहुअयामी असाआहे* .
पतेतीच्या दिवशी हे लोक *अग्यारी* ( प्रार्थनास्थळ ) मध्ये जावून प्रार्थना करतात.यांचे *पूर्वज प्राचीन इराणी लोक होय.मुळात हे लोक उंच ,मोठे डोळे उजळ रंगाचे व प्रेमळ स्वभावाचे असतात .यांच्या अहारात शेवया ,शिरा ,फालूदा ,अंडी मास असे पदार्थ असातात.त्यांच्या लग्नात व्याहीभेट असते चांदीच्या नाण्यांची देवाण घेवाण असते ,भांगात कुंकु पण भरतात लग्नात ,अक्षदा पण असतात *लग्नगाठी देवाने बांधल्या यावर विश्वास* असतो.*अंत्यविधी मात्र पूर्णपणे वेगळा म्हणजे शरिर ते प्राणीमात्रांना खाण्यास देतात .म्हणजे विहिर वर लटकवून ठेवतात.नंतर *घर गोमूत्राने स्वच्छ करतात*.
या लोकांचे *वैशिष्ट* म्हणजे यांनी कधीही *भांडण ,हक्क ,आंदोलन केले नाही* .सार्वजनीक मालमत्तेची *नासधूस ,दगडफेक ,गुंडगिरी ,दंगल मोर्चे केले नाही* ना कधी *अल्पसंख्यांक असून आरक्षण मागितले नाही* ( 2001 च्या जनगणने नुसार ही संख्या 70 हजाराहूनही कमी आहे )
पण हे लोक *उद्योग व्यवसाय विज्ञान तंत्रज्ञानात खूपच पुढे आहेत उद्योगात तर त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही रतन टाटा ,जे आर डी टाटा ,सायरस पुनावाला ,गोदरेज ज्यांच्या मुळे कोट्यावधी लोकांना रोजी रोटी मिळाली .होमी भाभा ,होमी सेठाना यांनी विज्ञानात जे केले ते तर आपण सगळेच जाणतो .कायदे पंडित तर त्यांचे निर्णय तर वाखण्या जोगे भलेभले लोक घाबरतात ते म्हणजे नानी पालखीवाला ,सोराबजी ,नरिमन अशी लोक पारशी र्धमाची प्रेमळ आहेत*
एवढेच काय तर देश पारतंत्र्यात असताना या मुठभर लोकातून पुढे येवून *आपल्या देशासाठी प्राणाची बाजी लावणारे दादाभाई नौरोजी ,फिरोजशहा मेहता ,भिकाई कामा ,पेटिट ,जहांगिर यांचे योगदान खूपच मोठे आहे .यांच्या मध्ये *मानवता* ठासून भरलेली आढळते त्याचे उदा. *जे आर डी टाटा ,रतन टाटा हे त्यांच्या एक पाऊल पुढेच आहेत*.त्यांच्या मध्ये व्यवसायाशी प्रामाणिकपणाचा मोठा गुण आहे .आज आपण टाटा कंपनीच्या नावाच्या कोणत्याही वस्तू अथवा खाण्याचे पदार्थ डोळे झाकून खरेदी करतो .हा विश्वास त्यांनी कमवला आहे . तसेच आज जे मोठ मोठे दवाखाने दिसतात ते म्हणजे *के .ई .एम ,जहांगिर ,रूबी हाॅल* या सारख्या हाॅस्पीटल मधुन आज पुणे मुंबईच नाही तर संपुर्ण महाराष्र्टातील लोकांना उपचार मिळत आहेत . तस म्हटले तर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लस उत्पादन करून समाजावर आपल्या भारतिय बांधवानवर त्यांचे उपकारच आहेत .ते भारतिय लोक विसरूच शकत नाहीत.
अशा आपल्या भारतीय पारशी बांधवांना नववर्षाच्या खूप खूप शूभेच्छा.💐💐💐💐💐💐
************************************************
श्री किरण दिपक सुतार, विषय शिक्षक, केंद्रशाळा चव्हाणवाडी,7709749093
*
30 comments:
पारशी लोकांच्या योगदानाबद्दल देश सदैव ऋणी राहील. छान माहिती..!!👍👍👍👍
छान माहिती
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत सर आपण. खूप खूप धन्यवाद.
छान माहिती
Very good..
खूप छान माहिती.
Nice information
सुंदर लेख सुतार सर
या पोस्टने पारशी बांधवांचे योगदान व पारशी दिनाचे महत्त्व समजते.
खूप छान माहिती मिळाली सर खूप खूप धन्यवाद🙏🙏👍👏👏👏
खूप छान माहिती सर.
खूप छान माहिती सर
उपयुक्त माहिती सर 👌👌
सर सुंदर लेख
अतिशय सुंदर विचार
अतिशय उत्तम माहिती
खूप छान व उपयुक्त माहिती.
खूप छान माहिती
शुभेच्छा
छान माहिती मिळाली
Very good
छान माहिती
खूप छान माहिती
सुंदर लेख
उत्कृष्ट माहिती
खूप छान माहिती👏👏👍
अतिशय उत्तम लेख आहे👌👌👏👏
सुंदर माहिती सर
खूपच छान माहिती... सर
उपयुक्त माहिती
Post a Comment