Sunday 20 August 2023

मग बघूया ! बाद में देखेंगे !

मग बघूया

                ✍️आयुष्यात असे काही क्षण असतात...हे करू की नको आणि अशावेळी आपण एक शब्द नेहमी वापरतो की 'मग बघूया....' आणि  ज्यावेळी  आयुष्याच्या  शेवटच्या   क्षणाला  आपण  ज्यावेळी   आयुष्याचा  चलचित्रपट  चालवतो   त्यावेळी  गोळाबेरीज  करताना  अशा   कितीतरी  गोष्टी असतात की त्या बाकी मध्ये राहिलेल्या असतात..
                 नक्कीच  मी  काय...आपण काय ही बाकी शून्य करू शकत नाही.पण कमी तरी नक्कीच करू शकतो.  बस्स..काय लागते... काहीतरी करण्याची इच्छा, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची कला,जे काय चांगले आणि विलक्षण आहे  त्या  उदात्त  गोष्टीवर  मनापासून प्रेम करण्याची शक्ती...पण मग हा शब्द आपल्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडवतो की आपले आयुष्यच एक adjustment करून टाकतो..
                 आयुष्यात पाहिजे असणारी एखादी गोष्ट पुढे ढकलायची असेल तर आपण नक्की वापरणारा  शब्द  म्हणजे... 'मग बघूया...' अगदी तारूण्यापासून म्हणजे आपण शाळेत असल्यापासून 'मग बघूया' या शब्दामुळे सूतपुत्र कर्णासारखं बाजूला पडतो.. कित्येक वेळा मनाला आवरून जगावं लागते.त्यावेळी नोकरी लागू दे 'मग बघूया', नोकरी लागल्यानंतर... लग्न होऊ दे 'मग बघूया',घर बांधून 'मग बघूया',मुले होऊ द्यात 'मग बघूया'..मुलांचे शिक्षण होऊ  देत 'मग बघूया',  मग  बघूया  म्हणत  म्हणत  काळाची  एवढीशी  खार  हळूहळू   एक  एक लाकूड स्मशानात नेऊन कधी सरण रचते कळतसुद्धा नाही.*मग कळते अरेच्या जगायचं राहूनच गेलं की...
                          मग आपल्या कल्पनेतील आनंद कल्पनेतच राहतो आणि नशीबाने मिळालेल्या माणसाचा जन्म आपण आयुष्यातील आलेल्या  परीक्षा  सोडवण्यात  घालवतो.. एक  पेपर  सोडवला  की  दुसरा  पेपर  तयार आणि धावत्या जगात जो मनातील आनंद घ्यायचा ठरवलेला  असतो..ज्या म नात इमारती बांधलेल्या असतात त्या ढासळून जातात..  जिवंत असेपर्यंतच आनंद घ्यायला हवा. नाहीतर राखेवर ठेवली जाणारी शेव आणि भज्जी फक्त काकस्पर्श ठरतील... सुखस्पर्श नाही..सुंदर  आयुष्य जगायला  फक्त  पैशाची  नव्हे  तर  गरज  आहे सुंदर  विचार करण्याची..नाही  तर  हे   आयुष्य   असेच  निघून जाईल...हे म्हणत की बाद में देखेंगे म्हणजेच मग बघूया....

श्री.किरण दिपक सुतार,केंद्रशाळा चव्हाणवाडी, ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर


  

53 comments:

Kiran Sutar Sir said...

खरच आपण काही गोष्टी नंतर पाहू म्हणून सोडून देतो व काही गोष्टी करायच्या राहतात.

Sagar teli vidya mandir Borgaon said...

छान विचार

Sagar teli vidya mandir Borgaon said...

छान विचार

Sanjay patil said...

पूर्ण सत्य, प्रत्येकाला असा अनुभव येतो

Sagar teli vidya mandir Borgaon said...

छान विचार

Sanjay patil said...

पूर्ण सत्य, प्रत्येकाला असा अनुभव येतो

Sanjay patil said...

खरंच आहे प्रत्येकाला येतो असा अनुभव

Shivaji Patil said...

खुप छान

अर्जुन उदाळे said...

छान माहिती सर

अर्जुन उदाळे said...

छान माहिती सर

अर्जुन उदाळे said...

छान माहिती सर

अर्जुन उदाळे said...

सुंदर माहिती सर

वृषाली पाटील said...

छान

K.S.Sutar said...

खूप अनमोल व प्रेरणादायी विचार

K.S.Sutar said...

खूप अनमोल व प्रेरणादायी विचार

K.S.Sutar said...

खूपच अनमोल व प्रेरणादायी विचार

Dhanaji ravindra Powar l said...

छान माहिती

Shyam Gaikwad said...

खूप छान सर

Shyam Gaikwad said...

खूप छान सर

Anonymous said...

छान लेख.

Anonymous said...

छान लेख.

Anonymous said...

मग बघुया) यावर छान विचार 👌👌

Anonymous said...

एक छान विचार 👌👌

सागर said...

खरचं आयुष्याचा आनंद मिळवला पाहिजे

सागर said...

खरचं एवढ जुनी जगायचं राहूनच जाते

सागर said...

खरचं एवढ जुनी जगायचं राहूनच जाते

Smukesh said...

जीवनातील प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.... सुंदर लेख..

Smukesh said...

सुंदर लेख...

Sunita Sushilkumar Shete. said...

That is real fact 😅👍 very very thought sir 🙏🙏😊

Dashu said...

मस्तच

Sunita Sushilkumar Shete. said...

सर्वांना विचार करायला लावणारी पोस्ट आहे👏👏👏👍

Sunita Sushilkumar Shete. said...

मनस्वी धन्यवाद सर🙏🙏🙏👍

Sunita Sushilkumar Shete. said...

मग बघूया म्हणण्या अगोदर विचार करावा लागेल😅😅🙏🙏👍

Anonymous said...

खूपच छान लेख.. आपल्या वास्तव सांगितले..

Krishnat Buva said...

Good thinking

Anonymous said...

मग बघुया यावर छान विचार 👌

Anonymous said...

मग बघुया यावर छान विचार

Anonymous said...

छान विचार आहे

Anonymous said...

छान विचार आहे

राहुल खलसे said...

वास्तव आहे.

Anonymous said...

Nice sir 👌👍👌👍

Anonymous said...

Nice sir

Ananda Ganpati mane sir said...

Very very nice thought sir Thanks a lot sir

Anonymous said...

Very nice post

Anonymous said...

Very nice post

श्री.मारुती लव्हटे said...

छान विचार आहे

Anonymous said...

छान विचार आहे

श्री.मारुती लव्हटे said...

मग बघुया यावर छान विचार

Anonymous said...

मग बघुया यावर छान विचार

Anonymous said...

Very nice sir 👍👌

ashoksir said...

सुंदर विचार.

uttamkoravi said...

खूप छान सर

Dagadu Buva said...

खूपच छान

करवीनिवासिनी अंबाबाई

  आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्य...